
आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती
परीक्षा देता- देता मझ असे वाटते
परीक्षा जीवनात काही संपत नाही
यश – अपयशाची गोडी चाखत
मन आज खिन्न होत आहे
मग हळूच मझ तुझे स्मरण होते.
तुच मला शिकविलेस जिवनात ,
सुख दुःखात ओठांवरती स्मित हास्य टिकविण्याची रिती
आज संध्याकाळी मी
निरभ्र आकाशच्या सान्निध्यात
उज्वल धवल स्वच्छ प्रकाशात लिहित आहे,
जीवनाच्या अनुभूतीची गाणे
मग हळूच वाऱ्याच्या मंद झुळकाचे, स्पर्श मझ होता
जानवे अशीच असे जणु
सुख, दुःखाची अनुभूती
गिरीवरूनी खळखळ वाहणारी ताटीनि जणु जीवनाच्या सप्तसुरांची न संपणाऱ्या
परीक्षेच्या गाथेचे दर्शन
मझ करुनी देत आहे.
रामप्रहरी क्षितिजा वरती
भास्कराच्या उद्याने
माझं मन प्रफुलित होऊनी
खुदकन गालात हसत स्वतःशी बोले
जीवनाच्या प्रत्येक वळणाच्या
परीक्षेपुढे कोणाचे काही ना चाले.
डॉ. परवीन शेख
ता .देगलूर जि. नांदेड,
महाराष्ट्र.












